esakal | मुंबईतल्या ७४ वर्षांच्या ज्येष्ठामुळे दोघांना जीवदान; फुफ्फुस, यकृताचं यशस्वी प्रत्यारोपण
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतल्या ७४ वर्षांच्या ज्येष्ठामुळे दोघांना जीवदान; फुफ्फुस, यकृताचं यशस्वी प्रत्यारोपण

कोविडच्या परिस्थितीत राज्यात पहिले फुप्फुस आणि यकृत प्रत्यारोपण नुकतेच यशस्वी पार पडलं आहे. यात ७४ वर्षीय ब्रेनडेड रुग्णाने दोघांना अवयवदान करून जीवदान दिले.

मुंबईतल्या ७४ वर्षांच्या ज्येष्ठामुळे दोघांना जीवदान; फुफ्फुस, यकृताचं यशस्वी प्रत्यारोपण

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः सध्या कोरोना व्हायरसनं कहर केला आहे. सर्वच जण या संकटाचा सामना करत आहेत. अशातच कोविडच्या परिस्थितीत राज्यात पहिले फुप्फुस आणि यकृत प्रत्यारोपण नुकतेच यशस्वी पार पडलं आहे. यात ७४ वर्षीय ब्रेनडेड रुग्णाने दोघांना अवयवदान करून जीवदान दिले. ३० जुलैला ७४ वर्षीय रुग्ण घरात पडला त्यामुळे त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केलं होतं. या रुग्णाच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना ब्रेनडेड घोषित केलं गेलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांकडून अवयवदानासाठी परवानगी घेतली. दोन रुग्णांवर फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केल्याची माहिती  रुग्णालयाचे क्रिटिकेअर विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत बोराडे यांनी दिली.

७४ वर्षीय रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा विकार होता. त्यामुळे हा रुग्ण गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होता, अशी माहिती मुंबई जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीचे डॉ. भरत शहा यांनी दिली. 

या रुग्णाचे फुप्फुस आणि यकृत अवयवदानासाठी चांगल्या स्थितीत होते. मात्र मूत्रपिंड निकामी झालं होतं.  दरम्यान मुंबईत फुप्फुस प्रत्यारोपणासाठी योग्य रुग्ण सापडला नाही. त्यामुळे चेन्नईच्या प्रत्यारोपण समितीशी संपर्क साधून आंतरराष्ट्रीय रुग्णाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर हे फुप्फुस चेन्नईला विशेष विमानसेवेद्वारे शस्त्रक्रियेसाठी पाठवलं गेलं. चेन्नई आणि राज्यातील टीमनं या अवयवदानासाठी विशेष साहाय्य केलं असल्याचं शहा यांनी सांगितलं. 

हेही वाचाः  ठाण्याच्या रेतीबंदर पुलावर भीषण अपघात, कंटेनर थेट खाडीत

लॉकडाऊनच्या काळात मुंबईच्या महिलेकडून पहिलं हृदय दान

काही दिवसांपूर्वी एका ३९ वर्षीय महिलेनं हृदय , यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान केलीत. मात्र, यात अख्ख्या महाराष्ट्रातील कोरोना काळात पहिले हृदय दान झाले असून कोरोना काळातील हे चौथे अवयवदान असल्याचे विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समिती कडून सांगण्यात आलंय. 

12 जुलै या दिवशी एका बेशुद्ध अवस्थेत 39 वर्षांच्या महिलेला नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला असल्याचे निदान करण्यात आले. रुग्णावर त्वरित न्यूरो सर्जनने शस्त्रक्रिया केली गेली. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर 17 जुलै शुक्रवारी रुग्णाला मेंदू मृत घोषित करण्यात आले.

अधिक वाचाः  येत्या 24 तासात मुंबईत कसा असेल पाऊस, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स

उपचार करणार्‍या डॉक्टर आणि प्रत्यारोपणाच्या समन्वयकांनी तिच्या कुटुंबियांना अवयवदानाबद्दल सुचवले. रुग्णाचे कुटुंबीय ही अवयवदानासाठी तात्काळ तयार झाले. यावेळी, यकृत, हृदय आणि दोन मूत्रपिंडांचे दान करण्यात आले. विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषांनुसार दान आणि प्रत्यारोपण करण्यात आले. लॉकडाऊननंतर राज्यातील हे पहिले हृदय दान ठरले असल्याचे सांगण्यात आले.

lung liver successfully transplant in mumbai Corona period two adults