आता इमारतीच्या बाहेर होणार तुमचं फुफ्फुसांचं स्कॅनिंग, पालिकेनं बसवली यंत्रणा

पूजा विचारे
Tuesday, 28 July 2020

या आठवड्यापासून मुंबई पालिका रहिवाशांच्या फुफ्फुसांचे स्कॅनिंग करण्यासाठी पोर्टेबल एक्स रे मशिन वापरणार आहे.

मुंबईः सध्या राज्यात कोरोनाचं सावट आहे. कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. तसंच मुंबईतल्या निवासी इमारतींमध्ये प्रकरणांची संख्याही वाढतेय. म्हणून वाढती संख्या रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पालिकेनं नवा निर्णय घेतला आहे. या आठवड्यापासून मुंबई पालिका रहिवाशांच्या फुफ्फुसांचे स्कॅनिंग करण्यासाठी पोर्टेबल एक्स रे मशिन वापरणार आहे.  पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की, केईएम रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाच्या समन्वयानं या मशीन्सचा उपयोग केला जाईल आणि दररोज अहवाल तयार केले जातील.

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितलं की, पालिकेनं अशा १० एक्स-रे मशीन मागवल्या आहेत, ज्या गेल्या आठवड्यात वितरित केल्या गेल्या. या मशीन्स व्हॅनमध्ये बसवण्यात येतील. त्यानंतर निवासी इमारतींकडे पाठवल्या जातील. आणि रेडिओलॉजिस्ट स्कॅनिंगचं रिडिंग करतील. आम्ही सात परिमंडळांच्या उपमहापौर आयुक्तांकडे मशीनची जबाबदारी सोपवली आहे, असे ते म्हणाले. हे यंत्र रुग्णांना ओळखण्यास मदत करतील, जरी कोणामध्ये लक्षणं नसतील तरी हे यंत्र ओळखतात. हे मशिन कोविड-19 संसर्गामध्ये फरक आणि इतर प्रकारचे श्वसन आजार यांचे स्कॅन करण्यास मदत करेल.

हेही वाचाः  ठाण्यानंतर मिरा रोडमधील 'या' रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द

दररोज अहवाल

प्रशासकीय प्रभागांपैकी कांदिवली, गोरेगाव आणि मालाड या भागांत सरासरी वाढीचा दर वाढला आहे. झोन IV चे उपायुक्त रंजीत ढाकणे (ज्यात पी दक्षिण आणि पी उत्तर वॉर्डांचा समावेश आहे) म्हणाले की, झोपडपट्ट्यांमधील प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आता निवासी सोसायट्यांकडे लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. आम्ही एक्स-रे मशीन वापरण्यासाठी तारखेनुसार योजना तयार केलीय. प्रामुख्याने अशा लोकांवर लक्ष केंद्रित केले जाईल ज्यांना व्हायरसचा संसर्ग होण्याचा उच्च धोका आहे आणि त्यांच्यात कमतरता आहे. मशीन केईएम रेडिओलॉजी विभागाशी जोडली जाईल. जसे रहिवासी स्कॅन करतील तेव्हा रुग्णालयाचे रेडिओलॉजिस्ट त्यांची तपासणी करुन त्याचा दररोज अहवाल तयार करतील, असं त्यांनी सांगितलं आहे.

Lung Scan Van Outside Building COVID-19 Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lung Scan Van Outside Building COVID-19 Mumbai