
माघी गणेशोत्सवाला आजपासून सिद्धिविनायक मंदिरात सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू झालेला उत्सव १९ तारखेपर्यंत असणार आहे.
मुंबई: माघी गणेशोत्सवाला आजपासून सिद्धिविनायक मंदिरात सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू झालेला उत्सव १९ तारखेपर्यंत असणार आहे. आज अग्निस्थापणा , गणुहोमने उत्सवाला सुरुवात झाली आहे. पुढच्या १९ तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या नित्य उत्सव काळातील पूजा केल्या जाणार आहे. पण यंदा इतर सणांप्रमाणे माघी गणेश उत्सवावर देखील कोरोनाचं सावट आहे.
यापूर्वी भक्तांना देण्यात आलेल्या QR कोडच्या नोंदणी प्रमाणे तेवढ्याच भक्तांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच दरवर्षी निघणारी श्रींची रथयात्रा यंदा प्रथमच नगर प्रदक्षिणा करणार नसून मंदिर आवारातच ही यात्रा केली जाईल. कोरोना संदर्भात जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करून यंदाचा उत्सव वाजता करण्यात येत आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
माघी गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारची नियमावली
- मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत, आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत.
- मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरता 4 फूट आणि घरगुती गणपती मूर्तीची 2 फूटांच्या मर्यादेत असावी.
- या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू/ संगमरवर मूर्तींचं पूजन करावं.
- मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं.
- माघी सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्य्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरं आयोजित करावी. तसंच श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क इत्यादीद्वारे उपलब्ध करावी.
- गणपती मंडपात निर्जंतुकीकरणाची आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी.
- मंडपात एकावेळी 10 पेक्षा जाता कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसंच एकावेळी फक्त 15 भाविकांना दर्शनासाठी प्रवेश द्यावा.
- मूर्ती विसर्जनाच्या वेळी जास्तीत जास्त 5 कार्यकर्ते असावेत.
------------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
maghi ganpati 2021 siddhivinayak mandir how will celebrating aadesh bandekar