प्राण्यांना जीव वाचवण्यासाठी ‘मॅजिक कॉलर’

प्राण्यांना जीव वाचवण्यासाठी ‘मॅजिक कॉलर’

कल्याण - रात्रीच्या वेळी वाहन चालवत असताना चालकाला रस्त्यावरील प्राणी नजरेस पडत नाही. अनेकदा हे प्राणी रस्ता ओलांडत असताना अपघातात मरण पावतात. मुक्‍या प्राण्यांच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी व रात्रीच्या वेळी चालकांना प्राणी ओळखण्यास मदत व्हावी यासाठी ‘पॉज’ या संस्थेने मॅजिक कॉलरचा उत्तम पर्याय अवलंबण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे अनेक प्राण्यांचे जीव वाचून अपघातही घटणार आहेत. 

मुख्यत्वे महामार्गावर भटकणारे कुत्रे, मांजर व अन्य प्राण्यांना वाहनांची धडक बसल्यामुळे कायमचे अपंगत्व येते. बहुतांश प्राणी तडफडून मरण पावतात. अनेकदा प्राण्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वारांनाही इजा होते. यावर उपाय म्हणून प्राण्यांच्या गळ्यात ‘जिक कॉलर’ लावण्याचे काम ‘पॉज’ संस्था करत आहे. ठाणे, कळवा, डोंबिवली, कल्याण आदी ठिकाणी संस्थेचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ५० प्राण्यांना ‘जिक कॉलर’ लावण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत सुमारे दोनशेहून अधिक मांजर आणि कुत्र्यांना सहा प्रकारची कॉलर लावण्यात आली आहेत.  या कॉलरमध्ये रेफलेक्‍टिव्ह रेडियमची पट्टी असते. या पट्टीवर दुचाकी किंवा मोटारचा प्रकाश पडल्यावर या पट्ट्या चमकतात, ज्यामुळे बाईक, कार व इतर वाहनांचा वेग नियंत्रणात आणता येतो आणि अपघात टळतो. एक किलोमीटर अंतरावरही पट्टे चमकतात.

आयआयटीच्या विद्यार्थ्यांची संकल्पना
बेंगळूरु येथील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी ‘जिक कॉलर’ची संकल्पना पुढे आणली. त्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी ही संकल्पना राबविण्याचे ‘पॉज’ या संस्थेने निश्‍चित केले. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्राण्यांना ‘जिक कॉलर’ लावण्याचे काम केले जाते. पावसाळ्यात रात्री वीज नसल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही आणि रस्ताही नीट दिसत नाही.

भटके कुत्रे आणि मांजरी अनेकदा रस्त्यावर वावरतात. त्यांचे प्राणही मोलाचे आहेत. या संकल्पनेमुळे चालक आणि प्राणी यांच्या जीवाला असणारा धोकाही कमी होतो. 
- नीलेश भणगे, सदस्य, पॉज संस्था '

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com