esakal | इमारत थरथरत असतानाही त्याने १५ जणांचा वाचवला जीव, महाड दुर्घटनेतील हिरोची कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

इमारत थरथरत असतानाही त्याने १५ जणांचा वाचवला जीव, महाड दुर्घटनेतील हिरोची कहाणी

"एक लहान मुलगा होता तळमजल्यावर, तो तिथे उभाच होता कारण त्याची आई बिल्डिंगमध्ये होती. त्याचे वडील बाहेरगावी असतात. त्याला बाहेर आणलं आणि बिल्डिंग पडली. "

इमारत थरथरत असतानाही त्याने १५ जणांचा वाचवला जीव, महाड दुर्घटनेतील हिरोची कहाणी

sakal_logo
By
सुमित बागुल

महाड  : कालची संध्याकाळ महाडकरांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. याला कारण ठरलं ती म्हणजे महाडमधील भीषण बिल्डिंग दुर्घटना. साधारण सहा सव्वा सहा वाजता महाडमधील तारिक गार्डन नामक अवघी ११ वर्ष जुनी इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीत तब्बल ४५ ते ४७ सदनिका होत्या. दुर्दैवाने या भीषण दुर्घटनेत एकाने आपला प्राण देखील गमावलाय. दरम्यान या दुर्घटनेच्या काही मिनिटं आधी इथल्याच एका तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तब्बल १५ जणांना इमारतीच्या बाहेर काढलंय. 

काल तारिक गार्डन इमारत भुईसपाट होण्याआधी इथल्या स्वप्नील शिर्के नामक तरुणाने प्रसंगावधान दाखवत या इमारतीमधील तब्बल १५ जणांचा जीव वाचवलाय. बिल्डिंग दुर्घटना होण्याआधी ही बिल्डिंग हालत होती. ही बाब लक्षात येताच स्वप्नीलने इमारतीमधील १५ जणांना तातडीने काढलं. स्वप्निलच्या माहितीप्रमाणे जर आणखी काही मिनिटांचा उशीर केला असता तर त्याच्यासकट सर्व पंधराजण इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकले असते. दरम्यान अनेकांचा जीव वाचवत असतानाच एक मोठा सिमेंटचा तुकडा कोसळला आणि स्वप्निलच्या पायाला दुखापत झालीये.

महाड दुर्घटना - क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, कोसळण्याआधी अशी दिसत होती तारीक इमारत

या दुर्घटनेबाबत बोलताना स्वप्नील म्हणाला की, पिलरवरील काहीतरी पडत होतं, मी बिल्डिंगच्या ऑफिसमध्येच होतो. एक मॅडम आल्यात आणि त्यांनी सांगितलं की असं झालंय, सगळ्यांना बाहेर काढ. म्हणून मी वर गेलो आणि सगळ्यांना बाहेर काढलं. या घटनेवेळी दोघे तिघे अडकले गेले होते. एक लहान मुलगा होता तळमजल्यावर, तो तिथे उभाच होता कारण त्याची आई बिल्डिंगमध्ये होती. त्याचे वडील बाहेरगावी असतात. त्याला बाहेर आणलं आणि बिल्डिंग पडली. 

मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत सिंगल लोड बेअरिंग होती. त्यामुळे ही भीषण दुर्घटना घडल्याचं बोललं जातंय. या इमारतीचे ठेकेदार युनुस शेख व पटेल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यताआहे. सध्या NDRF च्या दोन टीम्स घटनास्थळी रवाना झाल्या सून आणखीन एक NDRF ची टीम बचावकार्यासाठी पाठवण्यात येतेय. 

mahad building collapse swapnil shirke saved fifteen people while building was shaking

loading image
go to top