

Assembly Speaker Rahul Narwekar praised the play and assured full government support for the special performance.
Sakal
मुंबई : आज रंगमंचावरून पेटलेली ही ज्योत पुढील हजार वर्षे पिढ्यान्पिढ्या समाजाला समानता, स्वाभिमान आणि न्यायाचा मार्ग दाखवत राहील या शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाण्याने पेटला वणवा या आमदार राजकुमार बडोले लिखित नाट्यकलाकृतीचे कौतूक केल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त 'पाण्याने पेटला वणवा' हे मराठी नाटक रंगभूमीवर साकारण्यात आले आहे. या नाटकाचा दुसरा प्रयोग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणाच्या सभागृहात पार पडला. यावेळी विधानसभा अध्यक्ष बोलत होते.