

Mahalaxmi Saras Exhibition 2026
ESakal
महालक्ष्मी सरस आज महाराष्ट्रात महिलांच्या सशक्तीकरणाचे एक प्रभावी प्रतीक म्हणून उदयास येत आहे. राज्यात ५० लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’ सक्रिय आहेत. ज्यामुळे हा देशातील सर्वात मोठ्या कार्यरत महिला समूहांपैकी एक ठरतो. या महिला केवळ उद्योजिका नसून प्रत्यक्ष अर्थाने रोजगार निर्माण करणाऱ्या आहेत आणि त्या आपल्या कुटुंब व समाजाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. उमेद अभियानांतर्गत महालक्ष्मी सरस आता एका व्यापक जनआंदोलनाचे रूप धारण करत आहे.