

satej patil
esakal
महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने सरकारच्या अधिकृत चहापान समारंभावर बहिष्कार टाकला. भ्रष्टाचार, जनविरोधी धोरणे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त करत आघाडीने हा निर्णय घेतला. मंत्रालयात उघडपणे चालणारे ‘लक्ष्मीदर्शन’, शेतकऱ्यांची दयनीय स्थिती आणि घटनात्मक पदांचा अवमान यासारख्या मुद्द्यांवरून विरोधकांनी महायुती सरकारला जोरदार टीकेचे लक्ष्य बनवले.