"सचिन वाझे जमा केलेले पैसे अनिल देशमुखांच्या पीएला द्यायचा"

"सचिन वाझे जमा केलेले पैसे अनिल देशमुखांच्या पीएला द्यायचा" ईडीचा खळबळजनक दावा; याचिकेत अजूनही धक्कादायक खुलासे Maharashtra Anil Deshmukh PA instrumental in collecting cash from Sachin Waze says ED
Anil deshmukh
Anil deshmukhFile photo

ईडीचा खळबळजनक दावा; याचिकेत अजूनही धक्कादायक खुलासे

मुंबई - अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पलांडे आणि देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे यांच्या जबाबाच्या आधारावर निलंबित सचिन सचिन वाझेचे स्टेटमेंट नोंदविण्यासाठी विशेष NIA कोर्टात याचिका करण्यात आल्याची माहिती ईडीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिली. या याचिकेवर एनआयए कोर्टाकडून गुरुवारी सुनावणी होणार आहे. ईडीने यापूर्वीही वाझेचा जबाब नोंदवून घेतला होता. याचिकेतील महत्त्वाची बाब म्हणजे, अनिल देशमुखांच्या वतीने कुंदन शिंदे हेच वाझेकडून वसुलीची रोकड घेत असत असा दावा ईडीने केला आहे. (Maharashtra Anil Deshmukh PA instrumental in collecting cash from Sachin Waze says ED)

Anil deshmukh
मुंबईतून सुरू होती कोरोनावरील बनावट औषधांची 'ऑनलाईन' विक्री

मुंबईतील ‘ऑर्केस्ट्रा बार’ मालकांकडून पैसे गोळा करण्यासाठी आणि शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी पालंडे यांनी वाझे, डीसीपी राजू भुजबळ आणि एसीपी संजय पाटील यांच्याशी समन्वय साधला असल्याचा आरोप ईडीने केला आहे. डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२० दरम्यान वाझेने ४.७ कोटी रुपये जमा केले होते आणि ती रक्कम शिंदे यांच्याकडे दिली होती, असाही आरोप पलांडे यांच्यावर करण्यात आला आहे.

“शिंदे हे महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वतीने वाझेकडून रोख रक्कम गोळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांकडून याबाबत जबाब नोंदविण्यात आला असून वाझेच्या जबाबाची पुष्टीही करण्यात आली आहे", असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

Anil deshmukh
बीडीडी पुनर्विकासात म्हाडाला दररोज एक कोटींचे नुकसान

गेल्या आठवड्यात या दोघांची कोठडी घेताना ईडीने कोर्टात दावा केला होता की, पालंडे यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की पोलिस अधिकाऱ्यांच्या आणि विशेषत: IPS पोलिसांच्या बदल्यांमध्ये देशमुखांचा सहभाग होता. पोलिस आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांबद्दल चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि उमेदवारांची एक अनधिकृत यादीदेखील तयार करण्यात आली होती, असं त्यांनी सांगितल्याचा दावा ईडीने केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com