esakal | Maharashtra Assembly: विधानसभा अध्यक्षांकडून रवी राणा यांची कानउघाडणी

बोलून बातमी शोधा

Maharashtra Assembly: विधानसभा अध्यक्षांकडून रवी राणा यांची कानउघाडणी}

बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले संतापलेत.

mumbai
Maharashtra Assembly: विधानसभा अध्यक्षांकडून रवी राणा यांची कानउघाडणी
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दोन दिवसीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली आहे. याच दरम्यान बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले संतापलेत.

रवी राणा यांनी गळ्यात संत्र्यांचा हार घालून विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच थांबवलं. गळ्यातील संत्र्यांचा हार काढल्यानंतर त्यांना विधानभवनात प्रवेश देण्यात आला. 

दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार रवी राणा शेतक-यांच्या अत्याचारांचं फलक घालून वेलमध्ये आले. यावरून मग काही काळ विधानसभेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. सत्ताधारी आमदारही वेलमध्ये आले. अशा प्रकारे कोणी सभागृहात येत असेल तर त्यांना प्रवेश देऊ नये, असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी मार्शलना दिले.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शेतकऱ्यांचं मरण, हेच राज्य सरकारचं धोरण. उद्धवा अजब तुझे सरकार', असं लिहिलेलं बॅनरचा पोषाख परिधान करून रवी राणा यांनी सभागृहात प्रवेश केला. मात्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार रवी राणा यांच्या पोषाखावर आक्षेप घेत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. विधानसभा अध्यक्षांनी त्यांना सभागृहाच्या बाहेर जाण्याचे आदेशही दिले. मात्र त्यानंतरही रवी राणा यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरुच ठेवली.  दुसरीकडे या प्रकारानंतर सत्ताधारी आक्रमक झाले आणि त्यांनी राणा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा-  येत्या जानेवारीपासून मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार: विजय वडेट्टीवार

 Maharashtra Assembly 2020 Winter session Nana patole warned ravi rana