esakal | ''कोविडसारख्या महामारीवर माझं सरकार नियंत्रण मिळवतंय''
sakal

बोलून बातमी शोधा

''कोविडसारख्या महामारीवर माझं सरकार नियंत्रण मिळवतंय''

राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. सीमा भागातील रहिवाशांना  न्याय मिळवून देण्यास माझं सरकार तयार आहे, असं राज्यपाल म्हणालेत.

''कोविडसारख्या महामारीवर माझं सरकार नियंत्रण मिळवतंय''

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेनशाला सुरुवात झाली आहे. अनेक मुद्द्यांवर विरोधक राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधान भवन परिसरात भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले. दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. सीमा भागातील रहिवाशांना  न्याय मिळवून देण्यास माझं सरकार तयार आहे. कोविडची संख्या कमी करून धारावी सारखं काम करण्यास माझ्या सरकारने काम केलं असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत. राज्यपालांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या अभिभाषणाला सुरुवात केली. 

कोविड या संसर्गजन्य साथीवर माझ्या सरकारने नियंत्रण मिळवत आहे. 35 टक्के महसूल यावर्षी कमी आहे. अडीच लाख शेतकऱ्यांना 750 कोटी रुपयांचे अन्नधान्य पुरवलं आहे. शिवभोजन योजनेत 3 कोटी 15 लाख थाळी देण्यात आली, असंही राज्यपालांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढे आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले की, कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. माझे शासन कर्नाटक महाराष्ट्र विवाद बाबत सुप्रीम कोर्टात ठाम भूमिका मांडत आहे. मराठी भाषिक न्याय देण्यासाठी काम करत आहे. 

हेही वाचा-  काँग्रेस- भाजप आमनेसामने, विधानभवन परिसरात एकमेकांविरोधात घोषणाबाजी

माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला. कोरोना विरोधातील लढाई सुरु असून राज्य सरकारनं मी जबाबदार ही योजना सुरु केली. कोरोनासंदर्भातील आरोग्य उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं आपल्याला काळजी घेण्याची गरज असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. 

Maharashtra Assembly budget Session 2021 Governor Bhagat Singh Koshyari Speech