esakal | आज अधिवेशनाचा पहिला दिवस, १० दिवस विरोधक विविध मुद्द्यांवर घेरणार सरकारला
sakal

बोलून बातमी शोधा

आज अधिवेशनाचा पहिला दिवस, १० दिवस विरोधक विविध मुद्द्यांवर घेरणार सरकारला

विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस. यंदा दहा दिवस अधिवेशन होत आहे. १ ते १०  मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल.

आज अधिवेशनाचा पहिला दिवस, १० दिवस विरोधक विविध मुद्द्यांवर घेरणार सरकारला

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस. संजय राठोड यांचा राजीनामा जरी घेतला असला तरी विरोधक पहिल्या दिवशीच सरकारला विविध मुद्दयांवर घेरताना पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील कोरोना काळात जनतेला आलेली अव्वाची सव्वा बिले त्यामुळे केलेली वीजतोडणी त्याचप्रमाणे साडेतीन लाख लोकांना वीज तोडणी बाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. 

बोंडअळीने कापसाचे झालेले नुकसान, ९०% सोयाबीन वाहून गेले. मात्र शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत देण्यात आली नाही. महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले आहेत कारवाई केली जात. या मुद्दयांवर विरोधक आज सत्ताधाऱ्यांना घेरणार आहेत.

तसंच कालच मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाच्या मुद्द्यावरही विरोधक सरकारला अडचणीत आणू शकतात. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यंदा दहा दिवस अधिवेशन होत आहे. १ ते १०  मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. ८ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून ९ आणि १० मार्चला बजेटवर चर्चा होईल.  त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल.

दरम्यान,  अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस मात्र प्रवेशासाठी कोरोना रिपोर्ट सोबत असण बंधनकारक असताना अद्याप विधानभवनात कोरोना रिपोर्ट दिले जात नाही. म्हणून मोठ्या रांगा पास घेण्यासाठी लागल्या आहेत. यामुळे विधानभवन कर्मचारी वर्ग, पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. रिपोर्ट देण्यास उशिरा झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

maharashtra assembly budget session 2021 start today 1st march to 10 march

loading image