
मुंबई - ‘पंचांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी तुमच्याकडे ‘थर्ड अंपायर’ आहेत, आमच्याकडे निवडणुकीत असा थर्ड अंपायर असता तर अनेक निर्णय बदलले असते,’ असे सूचक आणि मार्मिक विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. निमित्त होते दिग्गज क्रिकेट प्रशिक्षक, अनेक क्रिकेट खेळाडूंचे गुरुवर्य रमाकांत आचरेकर सर यांच्या शिल्पाच्या अनावरण समारंभाचे.