

मुंबई : राज्यातील जनतेने आज सत्ताधारी महायुतीच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले. महाविकास आघाडीची अक्षरशः धूळधाण झाली असून विधानसभेच्या २८८ पैकी २३१ पेक्षा अधिक जागा जिंकत युतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १३० पेक्षा अधिक जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.