esakal | Maharashtra Budget 2021: देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget 2021: देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया

अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा २०२१- २२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.  अर्थसंकल्पावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. 

Maharashtra Budget 2021: देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई:  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा २०२१- २२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाचं संकट लक्षात ठेवून राज्याच्या आरोग्य विभागासाठी ७५०० कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आल्याचं अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं. या अर्थसंकल्पावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. मुंबई महानगर पालिकेचं हे बजेट वाटलं, अशी टीका फडणवीस यांनी केली. 

फडणवीस म्हणाले की, हे राज्य सरकारचं बजेट होतं की पालिकेचं असा प्रश्न मला पडला आहे. तसंच मुंबई महापालिकेतल्या बजेटमधल्या योजना ज्याला महाराष्ट्र सरकार एक रुपयाही देत नाही आहे. ज्या पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेच्या योजना आहेत. त्याही योजना या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आल्या आणि त्यातल्या काही योजना सुरु योजना आहेत. 

हेही वाचा-  मुंबईकर विनामास्क फिरू नका, दरदिवशी होतेय हजारो रुपयांची दंड वसुली

मुंबई संदर्भात इतर ज्या घोषणा घोषित करण्यात आल्या आहेत. त्या ट्रान्स हार्बर लिंक असो कि वांद्रे वर्सोवाची योजना असो शिवडी ते वरळी उड्डाणपूल असो हे सगळे आमच्या काळातल्या सरकारच्या काळात सुरु झालेत. त्यामुळे नवे प्रकल्प राज्य सरकारने घेतलेले नाहीत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडलं आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Maharashtra Budget 2021 Devendra Fadnavis first reaction budget

loading image