Maharashtra Budget 2023: गरीब मुलींना शिक्षणसाठी मिळणार 75 हजार रुपये; काय आहे 'लेक लाडकी' योजना जाणून घ्या

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.
Maharashtra Budget 2023: गरीब मुलींना शिक्षणसाठी मिळणार 75 हजार रुपये; काय आहे 'लेक लाडकी' योजना जाणून घ्या

मुंबई : राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना ७५ हजार रुपये रोख मिळणार आहेत. लेक लाडकी या नावानं ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे. (Maharashtra Budget 2023 Poor girls will get 75 thousand rupees for education Know details of Lek Ladki scheme)

काय आहे योजना?

फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये, इयत्ता चौथीत ४,००० रुपये, सहावीत ६,००० रुपये, अकरावीत ११ हजार रुपये अनुदान दिलं जाईल. लाभार्थी मुलीचं वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.

महिलांना निम्म्या दरात एसटी प्रवास

तसेच महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास तिकीट दरात सरसकट ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. महिला खरेदीदाराला घर खरेदी करताना १ टक्का सवलत देण्यात आली आहे. सध्याच्या अटीनुसार १५ वर्षांपर्यंत महिलेला पुरुष खरेदीदाराला घराची विक्री करता येत नाही. ही अट शिथील करुन इतर सवलती देण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com