esakal | Maharashtra Budget 2021: आज 2 वाजता सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget 2021: आज 2 वाजता सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज महत्वाचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. 

Maharashtra Budget 2021: आज 2 वाजता सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज महत्वाचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प मांडायला सुरुवात होईल. त्यामुळे कोविड नंतरचा कसा असणार आहे अर्थसंकल्प याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्प मांडायच्या आधी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा होईल. त्यात मखसुन हिरेन प्रकरणावर विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहेत.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना व्हायरसच्या काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षी अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा 9 हजार 500 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या अर्थसंकल्पात राज्यातील जनतेला काय दिलासा मिळणार याकडेच सगळ्यांचे लक्ष आहे. अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात करण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Budget Maha Vikas Aghadi government second Budget today Ajit pawar

loading image