esakal | म्हणून भर सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी मानले अजित पवार यांचे आभार
sakal

बोलून बातमी शोधा

म्हणून भर सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी मानले अजित पवार यांचे आभार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. वीज कनेक्शन तोडलं जाणार नसल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

म्हणून भर सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी मानले अजित पवार यांचे आभार

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. वीज कनेक्शन तोडलं जाणार नसल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि अजित पवार यांचे आभार मानलेत. 

लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिल आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला होता. मात्र वीज बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडण्याची मोहिम महावितरणने सुरू केली आहे. आज वाढीव वीज बिलाच्या मुद्दयावरुन भाजप आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनही केलं. दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुद्धा वादळी झाली. 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. फडणवीस यांनी नियम 57 अन्वये मुद्दा उपस्थित करत या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास पुढे ढकलावा अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
लॉकडाऊनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल आहे. एकाच वेळी एवढी मोठी रक्कम भरणे सर्वसामान्यांना शक्य नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. पण नंतर त्यांनी माघार घेतली. या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे किंवा तात्काळ वीज कनेक्शन तोडकाम थांबवले पाहिजे', अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. 

त्यानंतर अजित पवारांनी यावर उत्तर दिलं. जोपर्यंत चर्चेतून मार्ग निघत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी विधानसभेत केली.  तसंच  ऊर्जा विभागाकडून याची सविस्तर माहिती दिली जाईल, तोपर्यंत वीज कनेक्शन तोडण्याचे काम थांबवण्यात येत आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

हेही वाचा-  प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणात ऑडिट करण्याचा सरकारचा निर्णय

अजित पवार यांनी घोषणा केल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांचे आभार मानले आहेत.  अतिशय योग्य निर्णयाची घोषणा केली, त्याबद्दल मी अजित पवार यांचे आभार मानतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, जोपर्यंत यासंदर्भात निर्णय होत नाही, तोपर्यंत कुणाचीही वीज तोडण्यात येणार नाही. याबद्दल सरकारचे आभार मानतो. ज्यांची वीज तोडली, त्यांच्या जोडून द्या. त्यांनाही समान न्याय द्या, अशी माझी विनंती आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Maharashtra Budget Session 2021 Devendra Fadnavis thanked Ajit Pawar