सीताराम कुंटे यांना ईडीचं समन्स; अनिल देशमुख प्रकरणात होणार चौकशी | Anil Deshmukh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Secretary of the state

सीताराम कुंटे यांना ईडीचं समन्स; अनिल देशमुख प्रकरणात होणार चौकशी

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (sitaram kunte) यांनाही आता ईडीनं समन्स (enforcement directorate summons) बजावलंय. त्यांना उद्या म्हणजे 25 नोव्हेंबरला ईडी कार्यालयात चौकशासाठी (investigation in ED office) बोलावण्यात आलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या 100 कोटीच्या घोटाळ्यात ईडीला काही चौकशी करायची आहे, त्यासाठी सीताराम कुंटे यांना बोलावण्यात आलंय.

हेही वाचा: मुरबाड : बारवी धरण प्रकल्पग्रस्त अजूनही सुविधांपासून वंचित

अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना सीतीराम कुंटे गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते, त्यामुळं त्यांच्या चौकशीतून काही महत्वाची माहिती मिळू शकते , म्हणूनच त्यांना समन्स बजावण्यात आलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या कस्टडीत आहेत, त्यांची कस्टडी 29 नोव्हेंबरला संपणार आहे.

अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या प्रकरणासोबतच आणखी एका प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यातही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला. याही प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात हे समन्स बजावण्यात आलं आहे. याआधीही महासंचालक संजय पांडे आणि सीताराम कुंटे दोघांनाही समन्स बजावण्यात आलं होत.

चौकशीला येता येणार नाही

25 तारखेला मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक असल्यानं आपण ईडी कार्यालयात हजर रागू शकत नाही असं सीताराम कुंटे यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना कळवलं आहे.

loading image
go to top