esakal | महाराष्ट्र 'बंद'चा रेल्वेवर परिणाम नाही |Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

महाराष्ट्र 'बंद'चा रेल्वेवर परिणाम नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडीच्यावतीने सोमवारी, (ता.11) रोजी महाराष्ट्र बंद पुकारलेला होता. मात्र, या महाराष्ट्र बंदचा रेल्वेवर परिणाम झालेला दिसून आला नाही. मध्य, पश्चिम रेल्ववरील लोकल नेहमीप्रमाणे धावत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, बंदमुळे लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.

सोमवारी, (ता.11) रोजी महाराष्ट्र बंद असल्याने अनेक प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. लोकल सुरू असेल की नाही, अशी प्रवाशांमध्ये शंका होती. समाज माध्यमावरून सहप्रवाशांना लोकल सुरू आहेत का ? असे प्रश्न विचारण्यात येत होते. घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी रिक्षा, टॅक्सीची अपुरी सोय होती. अनेक जणांच्या कामाच्या ठिकाणी 'बंद'चे स्वरूप होते. परिणामी, अनेक प्रवाशांनी कामावर जाणे टाळले. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सकाळपासून गर्दीचे प्रमाण कमी दिसून आले. परंतु, लोकल सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत धावत होत्या. रेल्वेसेवेत बंदचा कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

loading image
go to top