मुंबई महानगरपालिकेचं स्वतंत्र विजनिर्मिती केंद्र सुरु करण्यास मान्यता..

मुंबई महानगरपालिकेचं स्वतंत्र विजनिर्मिती केंद्र सुरु करण्यास मान्यता..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सपाटा लावलाय. असाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. हा निर्णय आहे मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्राबद्दल.  

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून  आता विज निर्मिती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्य वैतरणा जलाशयातून विज निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

शिवसेनेने आपल्या 2002 च्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या वचननाम्यात मुंबई महानगर पालिकेचे स्वतंत्र विजनिर्मिती केंद्र मध्यवैतरणा जलाशय पूर्ण केल्यावर सुरु करणार असे वचन दिले होते. आता त्याचीच वचनपूर्ती आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यानी केली.

महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयात मुंबई महानगरपालिकेला आपले स्वतंत्र विजनिर्मिती केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून ही विज निर्मिती केली जाणार आहे. याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होतील.

मध्य वैतरणा मधून तयार करण्यात येणाऱ्या विजेचा फायदा मुंबईला तर होणारच आहे. याचसोबत मुंबईचा विजेचा भार कमी झाल्याने महाराष्ट्राला देखील याचा फायदा होणार आहे.

WebTitle : maharashtra CM uddhav thackeray gives permission to start new power generation plant

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com