विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन : उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 45 महत्त्वाचे मुद्दे

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन  : उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 45 महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : यंदाचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत पार पडलं. यंदा कोरोनाच्या सावटामुळे केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात आले. दरम्यान, अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रश्नांना उत्तर दिलं. विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले गेलेले, ज्यामध्ये मराठा आरक्षण, मेट्रो कारशेड, सरनाईक यांच्यामागील ED चौकशी आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावलेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे सर्व मुद्दे :      

  1. मला सर्व आरोपांना उत्तर द्यावेसे वाटत नाही, सरकारमधील मंत्र्यांनी समर्पक उत्तरे दिली आहेत. 
  2. मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करेन.
  3. राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा संवेदनशील विषय आहे, सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागेल तो लागेल. 
  4. गेल्या वेळी आपण जी वकिलांची फौज उभी केलेली ती तशीच आहे. ना भूमिका, ना वकील..  कुठेही काहीही बदल नाही.
  5. सर्वानुमते आपण लढाई लढत आहोत, आपण ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही. 
  6. मध्येच एक टुमणं कुणी सडक्या डोक्यातून काढलं माहित नाही.
  7. मराठा समाजाला न्याय हक्क देताना कोणत्याही समाजाचं एक कण देखील काढणार नाही.
  8. जे जातीपातीत आग लावतायत त्यांच्या आगीवर पाणी टाकावं लागेल.
  9. मी आज मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने बोलतोय, आम्ही महा जनाचा विचार करतोय.
  10. विरोधीपक्षनेत्यांनी आमचं पुस्तक वाचन केलं, कुंडल्या वाचणारे आज पुस्तक वाचतायत, आनंद आहे. 
  11. आज अधिवेशन दोन दिवस घयावे लागलं, संसदेचं अधिवेशन घेतलंच गेलं नाही. कोरोनाचा धोका अजूनही टळला नाही 
  12. WHO किंवा वॉशिंग्टन पोस्टला जे दिसलं ते काही जणांना दिसू शकलं नाही. 
  13. पंतप्रधानांनी एक प्रेझेन्टेशन घेतलं, ज्यामध्ये वॅक्सीन कसं द्यायचं याबाबद्दल बोललं गेलं 
  14. पूर्ण रामायण सांगितल्यावर रामाची सीता कोण हे सांगण्यात काय अर्थ? 
  15. आपण ही लढाई लढत आहोत, पाश्चिमात्य देशात कोरोनाचा आकडा वाढलाय 
  16. पुन्हा इथे कोरोना येऊ नये, म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागेल. 
  17. माझं कुटुंब माझी जबाबदारी ही योजना महाराष्ट्राने राबवली, त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा आरोग्याचा नकाशा तयार झाला. 
  18. आपण मृत्यूची आकडेवारी लपवलेली नाही, किंबवणं आपण लपवली नाही म्हणून इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्याती मृत्यूचा आकडा जास्त आहे का, हे पाहावं लागेल.
  19. आपल्याला यातून बाहेर पडायचं असेल तर काहीही लपवायचं नाही हे ठरलं आहे. 
  20. आपण  १७ दिवसात फिल्ड हॉस्पिटल बनवलं, आपण टास्क फोर्स बनवला, हे एकट्याचे काम नाही
  21. महाराष्ट्र म्हणून, एक कुटुंब म्हणून आपण या लढाईत उतरलो म्हणून आपण यावर नियंत्रण मिळवू शकलो. याचं श्रेय सर्वांना आहे.
  22. कांजूरच्या जागेवर कोर्टात विषय सुरु आहे, त्यावर जो काही निकाल लागायचा तो तो लागेल.
  23. मालकी कोणाची यापेक्षा प्रोजेक्ट कुणासाठी हे महत्त्वाचं,  हे कोर्टाचं म्हणणं आहे 
  24. त्या जागेवर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. 
  25. प्रोजेक्ट करताना आंदोलनं होतात, कोर्ट कचेऱ्या होतात, सगळं होतं. समृद्धी महामार्गाच्यावेळी आंदोलन झालं, विरोध झाला होता. 
  26. बुलेट ट्रेनची मागणी कुणी केलेली, बुलेट कुणाच्या फायद्यासाठी, मुंबईतीळ मोक्याची जागा जिची किंमत कितीही होऊ शकते.
  27. मुंबईची ऐन मौक्याची जागा आपण बुलेटसाठी दिली. 
  28. मुंबईतून किती लोकं तिथे जाणार, तिथून किती येणार ? मग मी जर असून बसलोय की ही मुंबईची जागा आहे, मी तिथेच कारशेड करणार तर ?
  29. पण,  मुंबईकरांच्या आनंदात मिठागराचा खडा टाकू नका'. राज्याच्या हिताच्या आड आपलं राजकारण येता कामा नये 
  30. मेट्रोबाबत जुनी माहिती समोर येईल, किती खर्च ठरला होता, मान्यता न मिळवता किती पैसे वाढले याची देखील माहिती समोर येईल 
  31. म्हणून प्रोजेक्ट अडवून ठेवायचा का ? 
  32. राज्याच्या हिताचं जे असेल, पर्यावरच्या हिताचं जे असेल, मुंबईच्या हिताचं जे असेल तेच आपण करतोय.  
  33. विकास करताना समजुतीने यावर मार्ग काढायला हवा 
  34. केवळ विरोधाला विरोध करणं म्हणजे राज्याला मातीत घालण्याचं काम करावं लागेल 
  35. देवेंद्रजींना दिल्लीत जायला हवं, सगळ्यांची तीच इच्छा आहे, विशेषतः मुनगंटीवारांची तीच इच्छा आहे, कारण ते देशाचा विचार करतात. 
  36. शेतकऱ्यांची मुद्दे मांडताना त्यांना देशद्रोही ठरवणे, त्यांच्या मागे चीन पाकिस्तानमधून मदत मिळतेय असं बोलणं हे आपल्या संस्कृतीमध्ये बसतं का ? 
  37. अघोषित आणीबाणी आणि घोषित आणिबाणीवर बोललं पाहिजे
  38.  सरकारवर टीका करेल तो तुरुंगात जाईल. मात्र तुमच्या आवडीच्यावर हक्कभंग आणला त्यामातर गे तुम्ही ED लावणार ?
  39. प्रताप सरनाईक याना ED, त्यांच्या मुलांवर ED, त्यांच्या दुसऱ्या भावाला ED, तरीही अजून नातू झाले नाहीत,  नाहीतर त्यांच्यामागेही ED लावली असती. 
  40. कदाचित आधीच समन्स देऊन ठेवतील, नातू झाल्या झाल्या चौकशीसाठी यावं लागेल 
  41. ही विकृती आहे, असं राजकारण आम्ही करत नाही, या राजकारणाला महाराष्ट्रात थारा नाही.
  42. कुणीही उठावं आणि आम्हाला टपली मारून जायचं आणि ते सहन करायचं,  हे होणार नाही. 
  43. येत्या काही मंदिरांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देणार आहोत. आपली प्राचीन मंदिरे आहेत, त्याच्या संवर्धनासाठी हे सरकार काम करेल, त्यासाठी वेगळा निधी राखून ठेवत आहोत 
  44. आपणही यामध्ये आम्हाला सूचना करा, आपण सर्वजण मिळून आपला सांस्कृतिक ठेवा आणि  वैभव वाढवण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो.
  45.  यावरून समजेल की आम्ही हिंदुत्त्व सोडलेलं नाही.


maharashtra CM uddhav thackerays speech in winter session 2020 all pointers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com