मनो रुग्णालयातही कोरोनाचा कहर; 24 जणांनी गमावला जीव

राज्यातील 4 रुग्णालयांमध्ये 883 रुग्णांना कोरोनाची लागण
Corona Patients
Corona PatientsSakal media

मुंबई : कोरोना विषाणूने (corona virus) गेल्या 21 महिन्यांपासून नागरिकांच्या आयुष्यात उलथापालथ सुरु ठेवली आहे. राज्यातील 4 मनोरुग्णालयात (Mental hospital) जिथे फक्त मानसिक रुग्णांवर (Abnormal patients) उपचार केले जातात, तिथेही कोरोनाने हाहाकार (corona infection) माजवला आहे. 2020-21 या वर्षात आतापर्यंत एकूण 883 रुग्णांना कोरोनाची लागण (corona) झाली असून त्यापैकी 24 रुग्णांना आपला जीव गमवावा (corona deaths) लागला आहे.

Corona Patients
राहुल गांधी यांचा मेळावा पुढे ढकलला; नवीन तारीख लवकरच

राज्यात ठाणे, पुणे, नागपूर आणि रत्नागिरी अशी एकूण 4 मनोरुग्णालये आहेत. जिथे हजारो रुग्ण राहतात. या रुग्णालयात सहसा काही निवडक नातेवाईकांनाच रुग्णाला बघण्याची किंवा भेटण्याची परवानगी असते, परंतु लॉकडाऊन आणि कोविडचा धोका पाहता ही संख्या देखील कमी आहे. असे असतानाही हा विषाणू रुग्णालयापर्यंत पोहोचला आणि सप्टेंबरपर्यंत एकूण एक हजार रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना याची लागण झाली.

ठाणे मनो रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संजय बोदाडे यांनी सांगितले की, काहीवेळा काही बेवारस रुग्णांना पोलीस किंवा इतर व्यक्ती आमच्याकडे  सोडतात, काही रुग्णांमध्ये कोविड झालेला असतो. तर दुसरे कारण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडूनही कोविड पसरु शकतो. ते घरातून रुग्णालय आणि रुग्णालयामधून घरापर्यंत प्रवास करत असताना संसर्ग पसरण्याची शक्यता असते. 

पुणे मानसिक रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. फडणवीस म्हणाले की, कोविड प्रोटोकॉलचे पालन करूनही काही रुग्णांना विषाणूची लागण झाली, सुरुवातीला आम्ही त्यांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवायचो, पण, नंतर खाटांचा तुटवडा वाढू लागला. त्यानंतर, रुग्णालयातच आयसोलेशन वॉर्ड बनवून त्यांच्यावर उपचार सुरू केले गेले.

पुण्यात 385 रुग्ण, 7 मृत्यू

पुणे मनो रुग्णालयात सप्टेंबर 2020-21 पर्यंत एकूण 4,569 रुग्णांची चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी 385 रुग्णांमध्ये कोविडची लागण झाल्याचे समोर आले. तर, त्यापैकी 7 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ठाण्यात 211 रुग्ण, 10 मृत्यू

21 सप्टेंबर 2020-21  पर्यंत ठाणे मनो रुग्णालयात एकूण 6,399 रुग्णांची चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी 211 रुग्णांमध्ये कोविडची लागण झाल्याचे समोर आले. तर, 10 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. 

Corona Patients
मुंबई : शाळा उद्यापासूनच होणार सुरू, मनपा शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

नागपुरात 226 रुग्ण, 6 मृत्यू

21 सप्टेंबर 2020-21 पर्यंत नागपूर मनो रुग्णालयात एकूण 2020 रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 226 रुग्णांना कोविड झाला. तर, 6 रुग्णांचा कोविडने जीव घेतला.

रत्नागिरीत 61 रुग्ण, 1 मृत्यू

रत्नागिरी मनो रुग्णालयात सप्टेंबर 2020-21 पर्यंत एकूण 918 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती, त्यापैकी 61 रुग्णांना कोविडची लागण झाली. तर, एकाला आपला जीव गमवावा लागला. अशा एकूण 24 मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. 

221 कर्मचारी संक्रमित, तिघांचा मृत्यू

राज्यातील 4 मनो रुग्णालयांमध्ये एकूण 221 कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. ठाण्यातील 1,129 कर्मचाऱ्यांची चाचणी केल्यानंतर 89 कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. पुण्यातील 1,132 कर्मचाऱ्यांची चाचणी केल्यानंतर 72 बाधित आढळले आहेत. नागपुरातील 372 कर्मचाऱ्यांची चाचणी केल्यानंतर 35 जणांना लागण झाली असून रत्नागिरीतील 80 कर्मचाऱ्यांपैकी 25 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी, ठाण्यात दोन आणि पुण्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

संक्रमितांची संख्या कमी

रुग्णालयांमध्ये हजारो रुग्ण आहेत, तरीही बाधितांची संख्या कमी आहे. कोविड संसर्गाचे एक कारण हे असू शकते की या आजारात सेवा देणारे कर्मचारी घरातून रुग्णालयात येताना आणि जाताना बर्‍याच लोकांच्या संपर्कात येतात, त्यामुळे बरीच खबरदारी घेऊनही काही कर्मचारी आणि रुग्णांना संसर्ग होतो.

डॉ. साधना तायडे, संचालक, आरोग्य आणि सेवा संचालनालय

कोविडचा अधिक धोका

"मनो रुग्णालयांबाबतची माहिती नाही, पण सहसा मानसिक आजाराने ग्रस्त रुग्ण कोविडचे नियम पाळत नाहीत. त्यांना तेवढे समजत नाही, मास्क दिले तर न घालणे, हात न धुणे, अशा प्रकारच्या बऱ्याचशा तक्रारी नातेवाईक करत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्यात संसर्गाचा धोका अधिक जास्त असतो. अशा रुग्णांना कुटुंबीयांनी समजून घेऊन त्यांची मानसिक स्थिती स्वतः समजून घेतली पाहिजे. डॉक्टरांशी संपर्क साधणे आणि उपचार सुरू ठेवणे गरजेचे आहे."

- डॉ. अविनाश डिसूजा, अध्यक्ष, बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटी आणि मानसोपचारतज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com