
uddhav and raj thackeray
esakal
महाराष्ट्रातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष होण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या बैठकीत ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. मतदार याद्यांतील लाखो खोट्या नावांचा, दुबार नोंदींचा आणि विचित्र त्रुटींचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी आयोगाला 'हरिश्चंद्र' नसल्याचा सवाल ठेवला.
"VVPAT देत नाहीत म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल का?" असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला, तर "८ टर्म निवडून येणारे बाळासाहेब थोरात ७०-८० हजाराच्या फरकाने कसे हरले? आयोग हा सत्ताधाऱ्यांसाठीच काम करतोय का?" असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.