मुंबई उपनगरात 133 गुन्हे दाखल; 42 लाखांचा मुद्देमाल जप्त | Maharashtra Excise department | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Excise Department
मुंबई उपनगरात 133 गुन्हे दाखल; 42 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई उपनगरात 133 गुन्हे दाखल; 42 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई : नववर्षाच्या व नाताळाच्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क (Maharashtra excise department) विभागाने चमकदार कामगिरी केली आहे. यानिमित्ताने मुंबई आणि उपनगरातील अवैध मद्य वाहतूक (illegal liquor supply), साठी आणि विक्रीवर कडक कारवाया करण्यात आल्या आहे. यामध्ये मुंबई क्षेत्रात 9 गुन्ह्यांची नोंद (Police FIR) करण्यात आली तर मुंबई उपनगरात तब्बल 133 गुन्ह्यांची नोंद करून तब्बल 42 लाख 87 हजार 146 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Property seized) करण्यात आला आहे. (Maharashtra excise department strict action against illegal liquor supply fir filed in Mumbai)

हेही वाचा: "सोसायट्यांवर लादण्यात आलेल्या अनाठायी निवडणूक खर्चाच्या निर्णयाला स्थगिती द्या"

मुंबई उपनगर अधीक्षक कार्यालयाने नाताळ, नववर्षाच्या निमित्ताने एकुण 14 कार्यकारी निरीक्षक, तसेच 2 भरारी पथकामार्फत आणि 3 विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात तसेच रेल्वेस्टेशन, विमानतळ व चेकपोस्ट अवैदय मदयनिर्मिती, वाहतुक व विक्री तसेच बनावट स्कॉच गुन्हयासंदर्भात धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये उपनगरात एकुण 133 गुन्ह्यांची नोंद झाली असून, 111 वारस गुन्हे तर 22 बेवारस गुन्हे आढळून आली आहे.

तर या प्रकरणात तब्बल 114 आरोपींना अटक केली असून, 8 वाहन जप्त करून 31 डिसेंबर पर्यंत 42 लाख 87 हजार 146 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे मुंबई उपनगराच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांनी सांगितले आहे. तर मुंबईत एकूण 9 गुन्हे दाखल केले असून, याप्रकरणी 9 आरोपींना अटक केली आहे. तर 37.98 लिटर देशी मद्य, विदेशी मद्य 1.8 लिटर जप्त करण्यात आले आहे. तर एकूण मुद्देमाल 14 हजार 215 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे मुंबई शहर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top