

dattatray bharane
esakal
मुंबई : शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा संपुष्टात येणार असल्याचे संकेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. विधान परिषदेत कलम २६० अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहमतीने ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.
यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचेही कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितले.