
किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार निर्णयाच्या तयारीत?
मुंबई : येत्या काही दिवसात जीवनावश्यक वस्तू म्हणजेच किराणाच्या दुकानांमध्ये वाईनची विक्री केली जाऊ शकते. (Wine In Glossary Shope ) त्यास राज्य सरकारकडून परवानगी मिळण्याची शक्यात विर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही किराणा दुकानात गहू, तांदुळ किंवा इतर वस्तू घेण्यास गेलात आणि तिथे तुम्हाला वाईन दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. या निर्णयाबाबत राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Government planning to sale wine in glossary shop)
हेही वाचा: कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये बचावलेल्या ग्रुप कॅप्टनचा मृत्यू
राज्य सरकारने याबाबत जर अध्यदेश काढला तर, तुम्हाल यापुढील काळात किराणा, दुकान, बेकरी आदींसह डिपार्टमेंटल स्टोअरमधूनदेखील तुम्ही वाईन खरेदी करू शकणार आहात. मात्र अशा प्रकारची वाईन खरेदी करताना एका लीटरमागे 10 रूपये अबकारी कर आकरण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात वाईनची विक्री केल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 5 कोटींचा महसूल जमा होणार असून वाईनची विक्री किती प्रमाणात होते याची माहिती सरकारला मिळण्यास मदत होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने परदेशातून आयात केलेल्या मद्यावरील विशेष शुल्काचा दर 300 टकक्यांवरून 150 टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहेत. तुर्तास, आठ प्रकारच्या दारूचे दर निश्चित करण्यात आले असून, लवकरच इतर कंपन्यांच्या दारूचेही दर अशाच प्रकारे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Web Title: Maharashtra Government Issue Notification Soon To Sale Wine In Grocery Stores
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..