अरे देवा! ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईत उपचार सुरु

अरे देवा! ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईत उपचार सुरु

मुंबई: सध्या महाराष्ट्र राज्य कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. राज्यासह मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच एक धक्कादायक बाब समोर आलीय ती म्हणजे, ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या त्यांच्यावर मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसंच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. 

उदगीर मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना गेल्या काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीमुळं त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळं त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली आणि तिचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय.  लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक रुग्ण आढळले होते. त्या दरम्यान बनसोडे सतत मतदारसंघात फिरत होते. तसंच, सततच्या संपर्कामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

काही दिवसांपूर्वी मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली. अस्लम शेख यांनी ट्विट करुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की,  मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला विलग (आयसोलेट) करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी,अशी विनंतीही अस्लम शेख यांनी आपल्या ट्विटमध्ये केली. 

यापूर्वी ठाकरे सरकारमधील तीन बड्या मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या तिघांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

Maharashtra government Sanjay Bansode has tested positive for the novel coronavirus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com