
मुंबई : राज्यातील पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या निर्णयामुळे राज्यातील पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाप्रमाणे सर्व सवलतींचा लाभ यापुढे मिळू शकणार आहे.