

Groundwater levels have declined in 223 talukas across Maharashtra, raising concerns over drinking water and agriculture.
esakal
मुंबई : राज्यात पावसाची अनियमितता, भूजलाचा अनियंत्रित उपसा आणि जल पुनर्भरणाकडे वर्षानुवर्षे केलेले दुर्लक्ष यामुळे पाणीटंचाईचे भीषण संकट समोर आले आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या ऑक्टोबरमधील ‘जिल्हानिहाय भूजल दुष्काळ निर्देशांक’अहवालानुसार, राज्यातील एकूण ३५३ तालुक्यांपैकी तब्बल २२३ तालुक्यांमध्ये (६३.१७ टक्के) भूजल पातळीत मोठी घसरण होऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ १३० तालुके (३६.८३ टक्के) सध्या सुरक्षित अर्थात सर्वसामान्य स्थितीत आहेत. भूजल पातळीतील खालावलेल्या स्थितीची तीव्रता अत्यंत तीव्र, तीव्र, मध्यम आणि सौम्य अशा चार श्रेणींमध्ये विभागण्यात आली आहे. राज्यातील २६ तालुके (७.३७ टक्के) ‘अत्यंत तीव्र’ भूजल दुष्काळाच्या छायेत आहेत. दुसऱ्या टप्प्यात ४२ तालुके (११.९० टक्के) ‘तीव्र’ भूजल दुष्काळाचा सामना करत आहेत.