
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर यांनी तुरुंगातील आरोपींकडून तब्बल ३०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा या दोघांनी केला आहे. विशेषतः वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित या आरोपांनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी गृह विभागामार्फत चौकशीचे आदेश दिले असून, यामुळे अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.