मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होणार ?

आयुक्त कांतीलाल उमाप यांचा शासनाला प्रस्ताव
Liquor
Liquor sakal media

मुंबई : राज्यात नवीन मद्यविक्री परवाने (New Liquor Licence) देण्याची बंदी असतांना मुंबईतील विमानतळ (Mumbai Airport) परिसरापुरते ही बंदी उठविण्याच्या हालचाली राज्य शासनाकडून केल्या जात आहे. पंजाब आणि दिल्ली (Punjab And Delhi) मद्य नियमावलीचा आधार घेत विमानतळांचा पुनर्विकास करणाऱ्या जीव्हीकेने यासबंधीत राज्याच्या गृहविभागाला (state Home Ministry) विमानतळावर मद्यविक्री परवाने देण्या संदर्भात पत्र व्यवहार केल्याचे समजते, त्यामुळे येत्या दोन दिवसीय अधिवेशनात मुंबईसह राज्यातील मद्य नियमावलीत बदल होण्याची शक्यता आहे. ( Maharashtra Liquor rules may change by state government)

जिव्हिकेने पंजाब, दिल्लीच्या विमानतळावरील मद्यविक्रीच्या धर्तीवर मुंबई विमानतळावर मद्य विक्री परवाने देण्याचे कारण सुद्धा समजावून सांगितले आहे. त्याप्रमाणे मुंबईसह राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर असे मद्यविक्री परवाने देण्याची मागणी सुद्धा केली आहे. त्यानुसार राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमप यांनी सुद्धा यापूर्वीच 14 मे रोजी गृहविभागाच्या प्रधान सचिव वल्सा सिंह-नायर यांना प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितल्या जात आहे.

Liquor
50 कोटींची मनी लाँडरींग केल्याच्या आरोपाखाली बिल्डरला अटक

ज्यामध्ये विमानतळावर नवीन मद्य विक्री परवाने दिल्यास मद्य विक्रीवरील शुल्क जादा प्रमाणात आकारता येईल शिवाय राज्याचा महसूल वाढण्यात मदत होणार असल्याचे उमाप यांनी आपल्या प्रस्तावात दावा करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे येत्या अधिवेशनात मुंबईसह राज्यातील मद्य नियमांमध्ये बदल केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईसह राज्यातील मद्य नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात प्रधानसचिव वल्सा नायर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांना प्रतिक्रिया मागितली मात्र,प्रतिक्रिया मिळाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com