Maharashtra Metro Expansion Fadnavis Orders Faster Completion of Mumbai Pune and Nagpur Metro Projects
sakal
मुंबई : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. अनावश्यक विलंबामुळे होणारी प्रकल्पातील खर्चवाढ टाळण्यासाठी काम सुरू झाल्यापासून मेट्रो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करा, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले.