भुशी धरण परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; सरकार नेमकं करतंय तरी काय? विधिमंडळात पटोलेंचा सवाल

विधिमंडळात स्थगन प्रस्ताव मांडत नाना पटोले यांनी लोणावळ्यातील दुर्घटनेप्रश्नी सरकारचे लक्ष वेधले.
Nana Patole
Nana Patole Sakal
Summary

राज्य सरकारला कशाचेच गांभिर्य नाही. विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाचेही सरकार पालन करत नसेल तर ही गंभीर बाब आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

मुंबई : लोणावळा (Lonavala) येथील भूशी धरण (Bhushi Dam) परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही काही पहिलीच घटना नाही, अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत. परंतु, अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, ते सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. आझाद मैदानातील असुविधांचा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला.

विधिमंडळात स्थगन प्रस्ताव मांडत नाना पटोले यांनी लोणावळ्यातील दुर्घटनेप्रश्नी सरकारचे लक्ष वेधले. नाना पटोले पुढे म्हणाले, की अशा घटना वारंवार होत असतानाही त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जात नाही. सुरक्षा देऊ, उपाययोजना करू अशी मोघम उत्तरे नकोत तर सरकार नेमक्या काय उपयायोजना करत आहे, यावर भूमिका स्पष्ट करावी असे सांगितले.

Nana Patole
कात्रज कोंढवा मार्गावर पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो पलटी; 20 वारकरी जखमी

आझाद मैदानाचा प्रश्न

आझाद मैदानावर अन्यायग्रस्त लोक आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. तेथेही चिखल आहे, काहीच सोयी सुविधा नाहीत, सरकार तेथेही दुर्घटना होण्याची वाट पहात आहोत का? लोकांच्या समस्यांकडे राज्य सरकार गांभिर्याने पाहतच नाही, असा संताप नाना पटोले यांनी व्यक्त केला. 'सकाळ'ने आझाद मैदानावरच्या परिस्थितीबद्दल सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.

पवईतील जयभीमनगर मधील ६५० मागासवर्गीय कुटुंबे पावसाळ्यात आजही रस्त्यावर रहात आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी असे निर्देश दिले असतानाही अद्याप ही कुटुंबे उघड्यावरच आहेत. सरकार बिल्डरांसोबत असेल तर त्यांनी तसे सांगावे.काल भीमनगरला भेट दिली पण परिस्थिती तशीच आहे. राज्य सरकारला कशाचेच गांभिर्य नाही. विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाचेही सरकार पालन करत नसेल तर ही गंभीर बाब आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com