maharashtra mumbai kalyan lok sabha election vote bjp ncp candidate
maharashtra mumbai kalyan lok sabha election vote bjp ncp candidateSakal

Lok Sabha Poll 2024 : उल्हासनगरात महायुतीतच पदाधिकाऱ्यांची पळवापळवी

भाजप मंडळ अध्यक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला, भाजपाकडून तात्काळ शेरी लुंड यांची नियुक्ती

उल्हासनगर -कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली असतानाच उल्हासनगरातील महायुतीतच पदाधिकाऱ्यांची पळवापळवी सुरू झाली आहे.कॅम्प 5 मधील भाजप मंडळ अध्यक्ष सुनील सुखेजा हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गळाला लागले असून त्यांनी माजी खासदार यांच्या हस्ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे.

सुनील सुखेजा हे राष्ट्रवादीत जाताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी,विधानसभा अध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी तात्काळ माजी नगरसेवक शेरी लुंड यांची मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

आनंद परांजपे हे उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांच्या कार्यलयात आले होते.त्यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष सुनील सुखेजा,गोविंद टाक,टीम ओमी कलानी संघटनेचे हितेश माखिजा आदींनी असंख्य कार्यकर्त्यां सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

भाजपच्या वरिष्ठांकडून कार्यकर्त्यांचे काम होत नसल्याचे कारण सांगत सुनील सुखेजा यांनी प्रवेश केला.त्यामुळे कॅम्प 5 परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सोनिया धामी,भाऊ गोंधळी,महिला जिल्हा अध्यक्षा रेखा अमर हिरा आदी उपस्थित होते.

यापूर्वीच याच परिसरातील भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले विजय पाटील,मीनाक्षी रवी पाटील शिवसेनेत तर राजेश वानखेडे यांनी उबाठा मध्ये प्रवेश केलेला आहे.भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील पक्ष आहेत.

कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना टीम ओमी कलानी यांनी पाठिंबा दिल्यानंतर दोन्ही पक्षांनी समन्वय बैठकीत टीओकेचा बॉयकॉट केला होता.त्यामुळे दोन्ही पक्षात समन्वय असल्याचे दिसून आले होते. मात्र भाजपचा मंडळाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने पळवल्याने हा समन्वय किती दिवस टिकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com