esakal | शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल राष्ट्रवादी आणि कॉंग्रसचं 'हे' ठरलं
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल राष्ट्रवादी आणि कॉंग्रसचं 'हे' ठरलं

शिवसेनेकडून आमच्या पाठिंब्यासाठी प्रस्ताव; काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण आवश्यक. पाठींब्याचा निर्णय लांबणीवर ?  

शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल राष्ट्रवादी आणि कॉंग्रसचं 'हे' ठरलं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशात आज मुंबईत आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबद्दल अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. काल शिवसेनेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस कडून समर्थनपत्र मिळालं नव्हत आणि राज्यपालांनी अतिरिक्त वेळ शिवसेनेला नाकारला होता. अशात आता महाराष्ट्रात काय घडतं यावर सर्वांच्या नजरा होत्या. अशातच मुंबईत आघाडीची महत्त्वाची बैठक पडलीये. यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालीये.  या बैठकीनंतर अहमद पटेल यांनी सोनिया गांधी यांच्याशी वार्ता करून या बैठकीची माहिती दिली अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान या बैठीकीतील माहिती उद्धव ठाकरे यांना देखील देण्यात आली सूत्रांची माहिती आहे. 

आज दोन्ही पक्षांच्या जेष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, अश्या पद्धतीचे निर्णय घेताना NCP आणि कॉंग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. 11.11. 2019 म्हणजे काल शिवसेनेने आम्हाला अधिकृतरित्या संपर्क साधून पाठींबा मागितला आहे. याबद्दल काही मुद्दे असे आहेत ज्यावर अधिक चर्चेची गरज असल्याची गरज दोन्ही पक्षांना वाटते. त्यामुळे आता याबाबत अधिक व्यापक चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं NCP आणि कॉंग्रेस ने संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. दोघांचा निर्णय झाल्यानंतर शिवसेनेशी संपर्क साधला जाणार आहे.  

दरम्यान, आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या या निर्णयामुळे आता शिवसेनेला देण्यात येणाऱ्या पाठींब्याचा निर्णय लांबणीवर पडलाय असंच म्हणावं लागेल. 

महाराष्ट्रात राजकीय गणितं वेळोवेळी बदललेली आपण गेल्या काही दिवसात पाहिलंय. अशातच मुंबईत आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातले आणि देशातील मोठे नेते चर्चेला उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, नवाब मलिक  हे उपस्थित होते.  याच सोबत कॉंग्रेस कडून मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के सी वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

Web Tittle :  maharashtra NCP and Cong conducts joint press conference   

loading image