योग्य वेळी आम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू - देवेंद्र फडणवीस

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray
Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray

मुंबई: "'तौक्ते' वादळाने (Taukte cyclone) देशातील अनेक राज्यात नुकसान केलं आहे. १००० कोटींची मदत गुजरातला करण्यात आली. त्याच प्रेस नोट मध्ये असं देखील सांगितल आहे कि, इतर राज्यांना मदत लवकरच मिळणार आहे. इतर कोणत्याही राज्यांनी मदत मिळणार नाही अस म्हटलेलं नाही. मात्र फक्त महाराष्ट्रातील मंत्र्यांची केंद्रावर टिका करण्याची स्क्रिप्ट तयार आहे" अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते (Maharashtra opposition leader) देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली. (Maharashtra opposition leader devendra fadnavis slam Maha vikas aghadi goverment)

"मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला फक्त जनतेची फसवणूक करायची आहे. सरकार जर मराठा आरक्षण संदर्भात गंभीर असतं, तर मागासवर्गीय आयोगाच्या अहवालासंदर्भात बाजू मांडण्यास कमी पडलं नसतं. आम्ही मजबूत कायदा केला आणि तो टिकवला देखील मात्र आपल्या राज्य सरकारला ते टिकवता आला नाही" असे फडणवीस म्हणाले.

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray
'त्यांच्यामुळेच आज मी जिवंत आहे', भारतीय नौदलाचे आभार मानताना अश्रू अनावर

"दुस-या लाटेसंदर्भात केंद्र सरकार सतत राज्य सरकारला सूचना करत होतं. मात्र राज्य सरकारने नियोजन शून्यता दाखवली. त्यामुळे ॲाक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू झाला. ॲाक्सिजन प्लांट वेळेत उभे केले असते, तर अनेक रूग्णांचे प्राण वाचवू शकलो असते असे फडणवीस म्हणाले. सध्या आमच लक्ष कोरोना स्थिती कशी आटोक्यात आणता येईल यावर आहे, मात्र योग्य वेळी आम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू" असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com