Maharashtra Politics : सच्चा आणि खरं बोलणारा नेता सत्तेत आला, अजित दादांच्या मनात मी - भाजपा आमदार गणपत गायकवाड

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी उलथा पालथ झाली आहे.
maharashtra politics ajit pawar bjp mla ganpat gaikwad eknath shinde dombivali
maharashtra politics ajit pawar bjp mla ganpat gaikwad eknath shinde dombivalisakal
Updated on

डोंबिवली - आज खरे तर एक सच्चा, खरे बोलणारे नेते सत्तेत आले आहेत. रागाने बोलतात पण खरे बोलतात असे अजित दादा असून आज त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मला आनंद आहे. राज्याच्या सत्तेत अजित पवार आल्याने आता विकासाची कामे आणखी वेगाने व चांगली होतील.

अजित पवार यांच्या जवळच नाही तर त्यांच्या मनात मी आहे असे म्हणत कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करत शुभेच्छा देऊ केल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी उलथा पालथ झाली आहे. पवार यांचा शपथविधी सोहळा यामुळे शिंदे गटात मोठी खळबळ माजली असली तरी भाजपाने अजित पवार यांचे स्वागत केले आहे.

maharashtra politics ajit pawar bjp mla ganpat gaikwad eknath shinde dombivali
Ajit Pawar News : शरद पवारांच्या गुगलीवर फडणवीसांचा सिक्सर, उद्धव ठाकरे हिट विकेट; केंद्रीयमंत्र्यांची प्रतिक्रिया

अजित पवार सत्तेत आल्याने कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना आनंद झाला आहे. उपमुख्यमंत्री पवार आणि आमदार गायकवाड यांचे पूर्वीपासून सलोख्याचे संबंध राहिले आहेत.

आमदार गणपत गायकवाड यांनी 2009 साली विधानसभेची निवडणूक अपक्ष निवडणूक लढवत राष्ट्रवादी पुरस्कृत आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर देखील त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजयी झाले.

maharashtra politics ajit pawar bjp mla ganpat gaikwad eknath shinde dombivali
Ajit Pawar News NCP : आज महाराष्ट्राचा 'दिगू टिपणीस’ झाला…; दादांच्या शपथविधीवर राज ठाकरेंची मार्मिक प्रतिक्रिया

2014 च्या विधानसभा अपक्ष म्हणून विजयी झाल्यावर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. दरम्यान अजित पवार हे महाराष्ट्राचे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष होते. कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावतीने कबड्डी स्पर्धा भरविण्यात आली होती.

या स्पर्धेला अजित पवार हे उपस्थित राहिले होते. पवार आणि गायकवाड यांचे सलोख्याचे संबंध राहिल्यानेच पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला. तसेच पवार यांच्या जवळच नाही तर त्यांच्या मनात मी आहे असे देखील ते म्हणाले.

maharashtra politics ajit pawar bjp mla ganpat gaikwad eknath shinde dombivali
Ajit Pawar: राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली! पक्षातील खासदार, आमदार पवारांच्या बंगल्यावर दाखल

आमदार गायकवाड म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकांच्या प्रति प्रेम आहे. आता अजित दादा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत. आज खरंतर एक सच्चा नेता, रागाने बोलतात पण खरं बोलतात असे अजित दादा आहेत.

असे खरे नेते महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आल्याच्या नंतर अजून विकासाची चांगली काम होतील. जी विकास कामे होत आहेत त्या विकासाच्या कामांमध्ये भर टाकण्यासाठी दादा आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात, खरोखर मनापासून खूप आनंद होतो.

मी अजित दादा यांना शुभेच्छा सुद्धा देतो, कारण महाराष्ट्राचा विकासच होणार आहे त्यामुळे. आता पक्ष वेगळे असेल तरी अजितदादा मला सन्मान देतात. आम्ही पण दादांचा आदर करतो नेहमी. मी त्यांच्या जवळच नाही तर मनात आहे. ते पक्षासोबत आल्याने आम्हाला आनंद आहेच. आता काम करताना अजून सोपं जाईल आम्हाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com