
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र सरकारच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित उपस्थिती लावली. या वेळी चर्चेचा विषय नेहमीप्रमाणे राजकीयच असला, तरी अचानक वातावरण हलकंफुलकं झालं.