MahaVikas Aghadi Morcha: "ड्रोन शॉटच्या लायकीचाही नव्हता"; मोर्चा संपताच फडणवीस माध्यमांसमोर

ही मंडळी कोणत्या तोंडाने आज मोर्चा काढतायत?
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSakal
Updated on

महाविकास आघाडीचा महामोर्चा हा नॅनो मोर्चा होता, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका केली आहे. महापुरुषांबद्दल भाजपा नेत्यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा संपताच देवेंद्र फडणवीसांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis
आज दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

या मोर्चावर टीका करत देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, "तीन पक्ष असूनही इतका छोटा मोर्चा काढला. आज कोणीही ड्रोन शॉट दाखवले नाहीत. सगळे क्लोज शॉट दाखवावे लागले. कारण हा मोर्चाच एवढा छोटा होता. आम्ही त्यांना म्हटलं होतं की आझाद मैदानावर या , पण मैदान भरणार नाही, हे त्यांना माहित होतं, म्हणून त्यांनी मुद्दाम मोर्चासाठी निमुळती जागा निवडली."

या मोर्चाबद्दल बोलताना फडणवीस पुढे म्हणाले, "आजचा मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा होता. जे संतांना, वारकरी सांप्रदायाला शिव्या देतात. ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला माहित नाही, असे लोक कुठल्या तोंडाने मोर्चा काढतात? माझा शिवसेनेला सवाल आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोज अपमान होत होता, तेव्हा का नाही मोर्चा काढला, काँग्रेसला हा सवाल आहे. सावरकर मोठे नव्हते का?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com