Maharashtra Politics: आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा; विनोद घोसाळकर यांचे निवेदन!

बदनामीच्या आरोपांविरुद्ध घोसाळकरांचा आक्रोश; न्यायाची मागणी | Ghosalkar's Outcry Against Defamation Charges; A demand for justice
Maharashtra Politics: आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा; विनोद घोसाळकर यांचे निवेदन!
Updated on

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या विनोद घोसाळकर करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अशा वेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा,' असे निवेदन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी जारी केले आहे

Maharashtra Politics: आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा; विनोद घोसाळकर यांचे निवेदन!
Maharashtra Politics: ''महाराष्ट्राची अधोगती थांबवायची असेल तर, गद्दारांना गाडून...'' आव्हाड नेमकं काय म्हणाले?

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरिवलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर घोसाळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह बाबी पसरवल्या जात आहेत. बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील, तर खुशाल तक्रार नोंदवा; पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत.

दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, अशा तीव्र भावना विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केल्या आहेत. अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवण्यासाठी बजावले आहे. '१९८२पासून मी सक्रिय राजकारणात आहे.

Maharashtra Politics: आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा; विनोद घोसाळकर यांचे निवेदन!
Maharashtra Politics: गणपत गायकवाडांच्या पाठीशी भाजप ठाम; मंजूर केला 'हा' ठराव

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समाजकारण या सूत्राचे तंतोतंत पालन करत आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेने राजकारण आणि समाजकारण केले आहे. शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत.

निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत. मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. नंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक आणि सून तेजस्वी हेसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही.

जनतेची आम्ही निःस्वार्थपणे सेवा केली, असे घोसाळकर यांनी निवेदनात नमूद करून बदनामीचे प्रकार थांबवण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Politics: आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा; विनोद घोसाळकर यांचे निवेदन!
Maharashtra Politics: राज्यात NCP विरुद्ध NCP, सेना विरुद्ध सेना; भाजपला कशी होणार मदत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com