esakal | लज्जास्पद ! चाईल्ड पोर्नोग्राफीमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर..

बोलून बातमी शोधा

लज्जास्पद ! चाईल्ड पोर्नोग्राफीमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर..
लज्जास्पद ! चाईल्ड पोर्नोग्राफीमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर..
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : भारतात अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल पॉक्सो कायदा (POCSO) आमलात  आहे. अशातही अत्यंत धक्कादायक आकडेवारी आता समोर येताना पाहायला मिळतेय. अमेरिकेतील एका संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये गेल्या पाच महिन्यात भारतातून तब्ब्ल २५ हजार व्हिडीओ अपलोड करण्यात आलेत. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हे व्हिडीओ अपलोड करण्यात आलेले आहेत. 

कोण-कोणत्या राज्यातून अपलोड होतात व्हिडीओ : 

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अन्वेषण आणि अमेरिकेतील ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉईटेड चिल्ड्रन’ या संस्थेच्या अहवालानुसार सर्वाधिक चाईल्ड पॉर्न व्हिडीओ हे राजधानी दिल्लीतून अपलोड झालेत. भीषण गोष्ट म्हणजे त्यामागोमाग नंबर लागतो महाराष्ट्राचा. महाराष्ट्रमागोमाग गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा नंबर लागतो. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे. 

मोठी बातमी देवेंद्र फडणवीस दुर्दैवी गृहमंत्री; वाचा कोणी म्हणलं..

कारवाई सुरु 

देशभरात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधातील पॉक्सो कायद्यात चाईल्ड पॉर्नोग्राफीची व्याख्या बदलण्यात आली, पॉक्सोची व्याप्तीदेखील वाढवण्यात वाढवण्यात आली. तरीही याअंतर्गत नोंद होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसतेय. सदर प्रकरणात महाराष्ट्रात अटकसत्र सुरु झाल्याचं महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने सांगितलंय. 

मुंबईतून ५०० व्हिडीओ अपलोड 

महाराष्ट्रातून एकूण १७०० व्हिडीओ अपलोड झालेत. यामध्ये मुंबईतून ५०० व्हिडीओ अपलोड झालेत. मुंबईमागोमाग ठाणे आणि पुणे या शहरांचा नंबर आहे. 

मोठी बातमी कपिल वाधवाला `मिर्ची` प्रकरण झोंबले!

maharashtra ranks second in child abuse report by national center for missing and exploited children