मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील चौदा गावे महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी निर्देश दिले असून त्यानुसार लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तेलंगण सीमाभागातील गावांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जिवती गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीनंतर दिली.