Pratap Sarnaik : महाराष्ट्रातील मोटार परिवहन सीमा चौकी लवकरच बंद होणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
Maharashtra Transport : जीएसटी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला असून, वाहतूक सुलभ करण्याचा यामागे उद्देश आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई : केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या ( RTO border check post) कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.