

Maharashtra government approves a 20 percent discount scheme on eligible pending traffic challans.
esakal
मुंबई : नियमभंग केलेल्या वाहनांवरील थकीत दंड भरून वाहन दंडमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र वाहतूक पोलिस चलान अभय योजना-२०२६ राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयानुसार प्रलंबित दंडाच्या रकमेवर २० टक्क्यांची सवलत मिळणार आहे.
मोटार वाहन कायदा १९८८ च्या अधिनियमातील तरतुदीनुसार वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालक, मालकांकडून दंड आकारण्यात येतो, या दंडाच्या आकारणी व वसुलीसाठी राज्यामध्ये चलान देण्याकरिता ३० जानेवारी २०१९ पासून वन स्टेट वन चलान प्रकल्प प्रणाली सुरू केली