

Vertical Property Card
esakal
Mumbai: महाराष्ट्रातील फ्लॅटधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकार प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या तयारीत आहे. या कार्डमध्ये फ्लॅटचा मालकी हक्क, क्षेत्रफळ, मालकाचे नाव, कर्ज आणि इतर कायदेशीर बोजांची माहिती नोंदवली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली. या प्रस्तावाचा लाभ राज्यातील सुमारे सात कोटी फ्लॅटधारकांना होण्याची शक्यता आहे.