मनसेला अनपेक्षित आघाडी | Election Result 2019 

maharashtra vidhan sabha 2019 result mns got lead in few seats
maharashtra vidhan sabha 2019 result mns got lead in few seats

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत कोणालाही अपेक्षा नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही जागांवर चांगली कामगिरी करेल, असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सकाळच्या पहिल्या फेरीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तेथे मनसेचे प्रमोद पाटील रिंगणात आहेत. त्याचबरोबर पुण्यात हडपसर येथे वसंत मोरे आणि कल्याण पश्चिम मतदारसंघात मनसेचे संदीप देशपांडे पहिल्या फेरीत आघाडीवर राहिल्याची माहिती मिळाली आहे. 

लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न देता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात जाहीर सभा घेऊन रान उठवले होते. त्यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' हा डायलॉग खूप चर्चेत होता. पण, एकही उमेदवार नसल्याने त्यांच्या हाती निवडणुकीत यश-अपयश काहीच नव्हते. या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ते निवडणूक लढवायची की नाही अशा पवित्र्यात होते. परंतु, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर  राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील कोथरूडसारख्या हायप्रोफाईल मतदारसंघात मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी देऊन लक्ष वेधले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेने आव्हान दिले आहे. यासह ठाणे, कल्याण, मुंबई या मनसेच्या पारंपरिक पॉकेटमध्येही मनसेने नशीब आजमावले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com