Vidhan Sabha 2019 : कल्याण पश्‍चिम : भाजपच्या बंडखोरामुळे लढतीला रंगत

सुचिता करमरकर
Friday, 18 October 2019

कल्याण पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपमधील बंडखोरीमुळे रंगत वाढली आहे. शिवसेना-भाजप युतीचे विश्‍वनाथ भोईर, भाजपचे बंडखोर नरेंद्र पवार आणि मनसेचे प्रकाश भोईर यांच्यात तिरंगी लढत आहे. १९९० पासून वॉर्डातील शिवसेना कार्यकर्ता ते कल्याण शहरप्रमुख म्हणून काम केलेले विश्‍वनाथ भोईर यांची जमेची बाजू आहे, ते मितभाषी आहेत. हाती घेतलेला उपक्रम पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा गुण हीच जमेची बाजू असेल.

विधानसभा 2019 : कल्याण पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपमधील बंडखोरीमुळे रंगत वाढली आहे. शिवसेना-भाजप युतीचे विश्‍वनाथ भोईर, भाजपचे बंडखोर नरेंद्र पवार आणि मनसेचे प्रकाश भोईर यांच्यात तिरंगी लढत आहे. १९९० पासून वॉर्डातील शिवसेना कार्यकर्ता ते कल्याण शहरप्रमुख म्हणून काम केलेले विश्‍वनाथ भोईर यांची जमेची बाजू आहे, ते मितभाषी आहेत. हाती घेतलेला उपक्रम पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा गुण हीच जमेची बाजू असेल. २००९ मध्ये आमदारकीची संधी मिळालेल्या प्रकाश भोईर यांच्याकडून कार्यकाळातील कामांचा लेखाजोखा मांडला जातोय. मागील पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून नरेंद्र पवार यांनीदेखील जनसंपर्क वाढवलाय.

विश्‍वनाथ भोईर 
बलस्थाने

    विविध सामाजिक संस्था-संघटनांमधील सहभाग. 
    साखरपुडा आणि हळदमुक्त गाव उपक्रमाला यश. 
    सामाजिक उपक्रम राबविण्यात सातत्य. 

उणिवा
    शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीचा फटका बसू शकतो. 
    मतदारसंघात कमी झालेला जनसंपर्क. 

प्रकाश भोईर 
बलस्थाने

    सामान्य नागरिकांमध्ये सहज मिसळणारा नेता. 
    २००९ मधील विकासकामांची शिदोरी. 

उणिवा
    आमदारकीनंतर कार्यकर्त्यांशी संवाद कमी. 
    २०१४ मधील पराभवानंतर नागरिकांशीही संपर्क दुरावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 kalyan west bjp rebel politics