महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा

काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वाची बातमी मुंबईतून समोर येतेय. काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून नाना पाटोले यांच्या राजीनाम्याची जोरात चर्चा सुरु होती. नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपवले जाणार अशीही चर्चा सुरु होती. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे असं बोललं जातंय.

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai 

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील पदाधिकारी बदलांची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होती. नुकतीच दिल्लीत सर्व काँग्रेस नेत्यांची हायकमांडने बैठक देखील घेतली होती. त्यानंतर नाना पाटोळे आपल्या पदाचा राजीनामा देणार या चर्चांची पुन्हा जोर धरला होता. दरम्यान आज अखेर नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या दिशेने टाकलं गेलेलं हे पाहिलं पाऊल असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.  

विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता पुढील काळात नरहरी झिरवळ यांच्याकडे पुढील विधानसभा अध्यक्ष निवड होत नाही तोवर संपूर्ण कामकाजाची जबाबदारी राहणार आहे.

maharashtra vidhansabha assembly speaker congress leader nana potole resigns

loading image
go to top