मुंबई | 4 नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी ; 9 माजी नगरसेवक पराभूत

मुंबई | 4 नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी ; 9 माजी नगरसेवक पराभूत

मुंबई, ता. 24 :  मुंबईत नगरसेवकांनी आमदार बनण्याची परंपरा याही निवडणुकीत कायम राहिली असून पालिकेच्या 4 नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी लागली आहे.शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर, दिलीप लांडे,भाजपचे नगरसेवक पराग शहा आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख या 4 नगरसेवकांनी बाजी मारली आणि आमदारकीची लॉटरी खिशात घातली.

मुंबईतील 36 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागला. त्यानुसार या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या 10 विद्यमान नगरसेवकांनी आणि 10 माजी नगरसेवकांनीही अधिकृतपणे तर काहींनी बंडखोरी करून निवडणूक लढवली;मात्र प्रत्यक्षात शिवसेनेचे नगरसेवक व अधिकृत उमेदवार रमेश कोरगावकर ( भांडुप प.) दिलीप लांडे ( चांदीवली), भाजपचे श्रीमंत नगरसेवक पराग शहा (घाटकोपर पूर्व) आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख ( भिवंडी) या 4 नगरसेवकांनी बाजी मारली आणि आमदारकीची लॉटरी खिशात घातली.यामध्ये,दिलीप लांडे यांनी काँग्रेस आमदार नसीम खान यांचा अवघ्या 409 मतांनी पराभव केला.तर पराग शहा यांनी भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांचा पत्ता कापून उमेदवारी मिळवली होती. त्याप्रमाणे पक्षाने ठेवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. 

6 नगरसेवकांचा पराभव

  1. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक व महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पक्षातील बंडखोरीमुळे पराभव झाला. काँग्रेसचे तरुण उमेदवार झिशान सिद्दीकी हे इथे जिंकलेत 
  2. बंडखोर राजुल पटेल यांचा भाजप पुरस्कृत आमदार भारती लव्हेकर यांच्यामुळे धक्कादायक पराभव झाला.
  3. काँग्रेसचे उमेदवार अमीन कुट्टी यांचा अंधेरी / पूर्व मतदारसंघात शिवसेना आमदार रमेश लटके यांनी पराभव केला.
  4. भायखळा मतदारसंघात शिवसेना  माजी नगरसेविका यामिनी जाधव यांनी अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांचा बहुमताने पराभव केला.
  5. मनसेचे अधिकृत उमेदवार संजय तुर्डे यांचा कालिना मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी पराभव केला.
  6. तर काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरीया यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना वांद्रे / पश्चिम मतदारसंघात चांगली टक्कर दिली मात्र अखेर त्यांचा पराभव झाला. 

9 माजी नगरसेवक पराभूत, यामिनी जाधव विजयी

या निवडणुकित आपले नशीब आजमावणाऱ्या 10 माजी नगरसेवकांपैकी एक शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यामिनी जाधव यांनी एमआयएमचे विद्यमान आमदार वारीस पठाण यांचा बहुमताने पराभव करून भायखळा विधानसभा मतदारसंघात इतिहास घडवला.

उर्वरित माजी नगरसेवक धनंजय पिसाळ ( विक्रोळी), विठ्ठल लोकरे ( मानखुर्द),अजंता यादव ( कांदिवली/ पूर्व), सुरेश कोपरकर ( भांडुप/ पश्चिम ), मुरजी पटेल (भाजप बंडखोर , अंधेरी/ पूर्व), संजय भालेराव ( शिवसेना बंडखोर, घाटकोपर / पश्चिम), एमआयएमचे चंगेज मुलतानी  ( अंधेरी / पूर्व), एमआयएमचे मनोज संसारे (धारावी), मनसेचे संदीप देशपांडे ( दादर - माहीम) यांचा पराभव झाला.

WebTitle : maharashtra vidhansabha elections and details of  various constituencies of mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com